Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेत मुलगी 18 वर्षांची झाल्यावर पूर्ण पैसे काढता येणार? जाणून घ्या काय आहे नवा नियम

मुलीच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी पालक सुकन्या समृद्धी योजनेत पैसे जमा करतात. या योजनेत दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास चांगली बचत करता येते. मात्र मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर खात्यात जमा असलेली रक्कम काढता येते का? जाणून घ्या याबद्दल सविस्तर

| Updated on: Oct 19, 2026 | 8:24 PM
1 / 6
मुलीच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी पालक सुकन्या समृद्धी योजनेत पैसे जमा करतात. या योजनेत दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास चांगली बचत करता येते. मात्र मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर खात्यात जमा असलेली रक्कम काढता येते का? असा प्रश्न पालकांना पडतो. याबाबत समजून घ्या नियम

मुलीच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी पालक सुकन्या समृद्धी योजनेत पैसे जमा करतात. या योजनेत दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास चांगली बचत करता येते. मात्र मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर खात्यात जमा असलेली रक्कम काढता येते का? असा प्रश्न पालकांना पडतो. याबाबत समजून घ्या नियम

2 / 6

सुकन्या समृद्धी योजनेत मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर, यापैकी जे आधी घडेल, तेव्हा उच्च शिक्षणासाठी खात्यातील काही रक्कम काढता येते. मात्र त्यासाठी संपूर्ण पैसे काढण्याची परवानगी नसते.

3 / 6

नियमांनुसार, मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस खात्यात असलेल्या शिल्लक रकमेच्या जास्तीत जास्त 50 टक्के रक्कम काढता येते. त्यासाठी मुलीच्या प्रवेशाची खात्री देणारे कागदपत्र किंवा शैक्षणिक संस्थेची फी भरल्याची पावती सादर करावी लागते.

4 / 6

संपूर्ण पैसे कधी काढता येतात? : या योजनेत खातं उघडल्याच्या तारखेपासून मुलीला 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्किम पूर्ण होते. त्यानंतर नियमानुसार खात्यातील संपूर्ण रक्कम आणि जमा झालेलं व्याज काढता येतं.

5 / 6

मात्र काही विशेष,परिस्थितींमध्ये खातं मुदतीपूर्वी बंद करण्याची तरतूद आहे. मुलीच्या लग्नासाठी ती किमान 18 वर्षांची असल्याची अट पूर्ण करून आवश्यक कागदपत्रं सादर केल्यानंतर नियमानुसा खातं बंद करता येऊ शकतं. लग्नाच्या 1 महिना आधी तर लग्नाच्या 3 महिन्यानंतर यासाठी अर्ज करता येतो.

6 / 6

पालकांनी कोणती गोष्ट लक्षात ठेवावी?: सुकन्या समृद्धी योजना ही दीर्घकालीन बचतीसाठी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर संपूर्ण रक्कम मिळते, अशा समज करू नये. शिक्षणासाठी ठराविक मर्यादेत रक्कम मिळवण्यासाठी सामान्यत: खात्याची 21 वर्षांची मुदत पूर्ण होणं आवश्यक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us