GK : देशातील सर्वात विषारी झाड, फळ खाल्लं तर सरळ बेतू शकतं जीवावर

झाडावर चविष्ट, पिकलेलं फळ दिसलं की अनेकांना ती खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही. पण प्रत्येक फळ खाण्यासाठी असतंच अस नाही. आपल्या देशात असंच एक फळ आहे. जे खाल्ल्याने माणसाच्या जीवावर बेतू शकतं.

| Updated on: Oct 21, 2026 | 9:16 PM
1 / 5
झाडावर चविष्ट, पिकलेलं फळ दिसलं की अनेकांना ती खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही. पण प्रत्येक फळ खाण्यासाठी असतंच अस नाही. आपल्या देशात असंच एक फळ आहे. जे खाल्ल्याने माणसाच्या जीवावर बेतू शकतं.कदाचित हे झाडं तुमच्या आजूबाजूलाही असू शकतं. त्या  विषारी झाडाचं नाव आहे 'सर्बेरा ओडोलम' ज्याला इंग्रजीत  'सी मँगो' असंही म्हणतात.

2 / 5

आता याच्या नावात आंबा आहे म्हणून हे फळ आंब्यासारखंच असेल अस तुम्हाला वाटलं असेल पण तस नाही आहे. या झाडाच्या बियांमध्ये सर्बेरिन नावाचा विषारी घटक असतो. हा घटक हृदयाच्या ठोक्यांवर आणि त्याच्या कार्यावर गंभीर परिणाम करू शकतो. त्यामुळे या झाडाचं फळ खाणं अत्यंत धोकादायक आहे.

3 / 5

फळ खाल्यानंतर शरीरात काय होतं? या झाडातील विषारी घटक शरीरात गेल्यानंतर हृदयाच्या ठोक्यांची लय बिघडवू शकते.गंभीर विषवाधा झाल्यास हृदयाच्या कार्यात धोकादायक बदल होऊ शकतात.

4 / 5

चुकून फळ खाल्लं तर काय कराव?: अनोळखी फळ खाल्यानंतर मळमळ, उलटी, चक्कर किंवा अस्वस्थता जाणवली तर लक्षणांची वाट न पाहता तातडीने वैद्याकिय मदत घ्या. उलटी करण्याचा प्रयत्न करू नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घरगुती उपचार करू नका.

5 / 5

थोडक्यात सांगायचं तर झाडावरचं फळ दिसलं म्हणून चे आंबाच असेल अस नाही,निसर्गात सुंदर दिसणाऱ्या काही वनस्पतीही विषारी असू शकतात.त्यामुळे अनोळखी फळ खाण्याचा मोह टाळा आणि स्वत:ची काळजी घ्या

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us