
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा तिच्या चाहत्यांमध्ये खास स्टाईलसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव असणारी मोनालिसा आपल्या बोल्ड स्टाईलनं अनेकदा चाहत्यांना वेड लावते.

मोनालिसा नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करुन सोशल मीडियावर धुमाकूळ घालते. नुकतंच मोनालिसानं एक फोटोशूट केलं आहे, ज्याचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मोनालिसानं आपले नवीन खास फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती ब्लॅक शॉर्ट स्कर्ट आणि टॉपमध्ये दिसत आहे.

यादरम्यान तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.

मोनालिसाचे हे नवीन फोटो चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरत आहेत. चाहच्यांकडून फोटोंवर जोरदार लाईक्स आणि कमेंट्स पाऊस पडत आहे. मोनालिसाने 'ब्लॅकमेल' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या सिनेमात मोनालिसाने सुनील शेट्टी आणि अजय देवगणसोबत काम केले होते.