Aai Kuthe Kay Karte | देशमुखांच्या घरात अभिषेक-अनघाच्या लग्नाचा थाट! संगीत सोहळ्यात पाहायला मिळाली रेट्रो लूकची झलक!

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत सुरु झालीय लगीनघाई. बऱ्याच दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती त्या अभिषेक आणि अनघाचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे.

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Dec 30, 2021 | 8:45 AM
1 / 5
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत सुरु झालीय लगीनघाई. बऱ्याच दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती त्या अभिषेक आणि अनघाचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे.

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत सुरु झालीय लगीनघाई. बऱ्याच दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती त्या अभिषेक आणि अनघाचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे.

2 / 5

या विवाहसोहळ्यासाठी संपूर्ण देशमुख कुटुंब उत्साहात असून खास संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. या संगीत सोहळ्यात देशमुख कुटुंबाने रेट्रो लूक धारण केलाय.

3 / 5

अनिरुद्ध-संजना, अभिषेक-अनघा, माई-अप्पा, यश-गौरी आणि इशाने सदाबहार मराठी गाण्यांवर ठेका धरत संगीत सोहळ्याची रंगत द्विगुणीत केली आहे.

4 / 5

या संगीत सोहळ्यात आशुतोषही सामील झाला आहे. अरुंधती आणि आशुतोषमधील ही वाढती मैत्री अनिरुद्धला मात्र खटकते आहे. त्यामुळे एकीकडे आनंदाचं वातावरण असताना अनिरुद्ध मात्र अस्वस्थ आहे.

5 / 5

देशमुख कुटुंबातला हा अनोखा विवाहसोहळा मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळणार आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका आई कुठे काय करते दररोज रात्री 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us