
अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री नेहा पेंडसेनं (Neha Pendse) काही महिन्यांपूर्वी टीव्ही इंडस्ट्रीमध्येही कमबॅक केलं आहे. सध्या नेहा ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेत गोरी मेमची भूमिका साकारताना दिसतेय.

नेहा गेले अनेक दिवस नवनवीन फोटोशूटचे सुंदर फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करताना दिसतेय.

आता नुकतंच तिनं एक सुंदर आणि बोल्ड फोटोशूट केलं आहे. काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.

नेहा नुकतंच ‘जून’ या चित्रपटात दिसली होती. तर आतापर्यंत तिनं ‘पडोसन’, ‘हसरते’, ‘मीठी मीठी बाते’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘फॅमिली टाइम विद कपिल शर्मा’ यामध्ये काम केलं आहे.

तर नेहानं बॉलिवूड चित्रपट ‘प्यार कोई खेल नहीं’, ‘दाग: द फायर’, ‘दीवाने’, ‘तुमसे अच्छा कौन है आणि ‘देवदास’ यासारख्या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.