Kareena Kapoor : बेबोच्या चाहत्यांसाठी खुशखबर!, करिना कपूर ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर चाहत्यांच्या भेटीला येणार

बेबो अर्थात करिना कपूर खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. करिना ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आयेशा सय्यद | Updated on: Mar 16, 2022 | 12:17 PM
1 / 5
बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर खान तिच्या नव्या इनिंगसाठी सज्ज झालीय. करिना आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर खान तिच्या नव्या इनिंगसाठी सज्ज झालीय. करिना आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

2 / 5

करिना कपूरचा नेटफ्लिक्सवर एक सिनेमा येतोय. करिनाने एक व्हीडिओ आणि फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे.

3 / 5

या आगामी सिनेमाच्या मेकिंगचा व्हीडिओ शेअर करत तिने या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. तिच्या या नव्या सिनेमामुळे बेबोचे चाहते खुश झाले आहेत.

4 / 5

92 हजार जणांनी ही पोस्ट लाईक करत करिनाला या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. "ऑल द बेस्ट बेबो! मी हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहे. लवकरात लवकर हा सिनेमा पाहता यावा.." अशी इच्छा तिच्या एका चाहत्याने व्यक्त केली आहे.

5 / 5

सुजय घोष दिग्दर्शित करिनाच्या या आगामी सिनेमात विजय वर्मा आणि जयदीप आहलावत देखील मुख्य भूमिका साकारताना पहायला मिळणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us