
बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या हटके स्टाईल आणि चित्रविचित्र कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असते. तिची ही स्टाईल काहींना आवडते तर काहीजण तिच्या या स्टाईलची खिल्ली उडवत असतात.

आज उर्फी जावेदला मुंबईतील अंधेरी भागात स्पॉट केलं गेलं.यावेळी तिने लाल रंगाचा हटके वनपीस घातला होता.

या ठिकाणी उर्फी जावेदसोबत राखी सावंतदेखील पहायला मिळाली. या दोघींना एकत्र स्पॉट केलं गेलं.

दोघींमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्याचं पहायला मिळालं.

राखीने यावेळी लाईट ग्रीन कलरचा टॉप आणि निळ्या रंगाची स्कीन टाईट पॅन्ट घातली होती.

या दोन कॉन्ट्रोव्हर्सी 'क्वीन्स' एकाच फ्रेममध्ये कैद झाल्या.

उर्फी जावेदने लाल रंगाच्या पोस्ट बॉक्स समोर फोटो काढला. तिच्या कपड्यांचा आणि या पोस्ट बॉक्सचा रंग अगदी सेम टू सेम आहे.