आईच्या वाढदिवसाला खास ‘ठेवणीतले फोटो’, सेम टू सेम सारा-अमृता, फोटो पाहाच…

अमृता सिंह यांच्या वाढदिवसानिमित्त सारा अली खाने त्यांचे सेम टू सेम फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहे.

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 09, 2022 | 2:35 PM
1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने आपल्या इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत आणि आपली आई आणि अभिनेत्री अमृता सिंह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने आपल्या इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत आणि आपली आई आणि अभिनेत्री अमृता सिंह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

2 / 7

सारा अली खान ही अमृता सिंह आणि अभिनेता सैफ अली खान यांची मुलगी आहे.

3 / 7

"Happy Happy Happy Birthday Mommy... मी वचन देते की तुला आनंद होईल, माझा अभिमान वाटेल असं काम मी नेहमी करत राहिन. तू दिलेली शक्ती, सौंदर्य, आणि तुझं तेज कायम जपण्याचा, त्याला आत्मसात करण्याचा मी दररोज प्रयत्न करेन", असं कॅपशन तिने या फोटोला दिलं आहे.

4 / 7

सारा सेम टू सेम आपली आई अमृता सिंह यांच्या सारखी दिसते. तिने हे साम्य दाखवणारे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

5 / 7

साराचं नुकतंच 'चका चक' हे गाणं प्रदर्शित झालं त्यातला हा फोटो अगदी अमृता सिंह यांच्या सारखा दिसतो.

6 / 7

साराचा हा ब्लॅक कलरच्या वनपीसमधला फोटो, तिची केसाला हात लावण्याची स्टाईल सगळंच अगदी सेम टू सेम अमृता यांच्यासारखंच आहे

7 / 7

लेंहेगा घातलेला सारा आणि अमृता यांचा हा फोटोही अगदी सेम दिसतो. या दोघींच्या दिसण्यातील साम्यांची सोशल मीडियावर चर्चा होतेय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us