Gudipadwa 2022 : डोंबवलीतील शोभायात्रेत ‘चंद्रमुखी’ सहभागी, पाहा अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांचे खास फोटो…

अभिनेत्री अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांचा चंद्रमुखी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे.या दोघांनी एकत्र गुढीपाडवा साजरा केला.

आयेशा सय्यद | Updated on: Apr 02, 2022 | 5:05 PM
1 / 5
अभिनेत्री अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांचा चंद्रमुखी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे.या दोघांनी एकत्र गुढीपाडवा साजरा केला.

अभिनेत्री अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांचा चंद्रमुखी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे.या दोघांनी एकत्र गुढीपाडवा साजरा केला.

2 / 5

आज गुडीपाडव्यानिमित्त अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे या दोघांनी डोंबिवलीतील शोभा यात्रेत हजेरी लावली. त्यांनी या शोभा यात्रेत स्थानिकांसोबत डान्स केला.

3 / 5

अमृताने यावेळी पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. तर आदिनाथने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. या दोघांनीही या शोभायात्रेत धमाल केली.

4 / 5

अमृताने यावेळी झांझ वाजवत शोभा यात्रेचा उत्साह वाढवला. या शोभायात्रेत सहभागी झालेल्या पथकासोबत तिने झांझ वाजवण्याचा आनंद लुटला. आदिनाथने ढोल वाजवत या शोभायात्रेला चार चांद लावले.

5 / 5

"दोन वर्षानंतर असा उत्साह अनुभवता आला, आज मी खूप आनंदी आहे," असं अमृता यावेळी म्हणाली, तर "बऱ्याच काळानंतर मास्कमुक्त आणि आपल्या माणसांमध्ये सणवार साजरे करताना खूप आनंद होतोय", असं आदिनाथ म्हणाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us