
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने आपल्या बोल्ड अभिनयातून चाहत्यांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर कोट्यावधी लोक तिला फोलो करतात. ती तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसाठी सतत शेअर करत असते.

मोनालिसानं पश्चिम तसेच पारंपारिक अवतारात कहर केला. तिनं आता काळ्या रंगाच्या साडीत फोटो शेअर केले आहेत, जे फोटो पोस्ट होताच व्हायरल झाले आहेत.

हे फोटो शेअर करत मोनालिसानं चाहत्यांना घायाळ केलं आहे. त्याचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरतो आहे.

वेगवेगळ्या पोज देत तिनं हे फोटोशूट केलं आहे.

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. शिवाय सध्या मोनालिसा टीव्ही सीरियल नमक इश्क का मध्ये दिसते आहे. शोमधील तिच्या नकारात्मक पात्राला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.