
कॉमेडी शो 'भाभी जी घर पर हैं!' मधील नवीन गोरा मेम म्हणजेच नेहा पेंडसेनं तिच्या अनोख्या स्टाईलने इंटरनेटवर दहशत निर्माण केली आहे. तिनं अतिशय हॉट ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. आता तिचे हे फोटो समोर येताच व्हायरल झाली आहेत. नेहमी साडी आणि सलवार सूटमध्ये दिसणाऱ्या नेहाची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे.

या सगळ्या फोटोंमध्ये नेहा हॉट अँट ब्युटिफूल अंदाजात दिसत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

तिनं गोल्डन कलरचा डीप नेक ड्रेस परिधान केला आहे. यात तिच्या पोझ खूपच सुंदर दिसत आहेत.

याआधीही नेहाला तिच्या हॉट स्टाईलमुळे सोशल मीडियावर अनेकदा प्रशंसा मिळाली आहे.

पण लग्नानंतर तिने पहिल्यांदाच असे बोल्ड फोटोशूट केले आहे. काही महिन्यांपूर्वी नेहानं 'भाभी जी घरी पर हैं!' या मालिकेत अनिताच्या भूमिकेत प्रवेश केला आहे.