
'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवाला सध्या तिच्या मालदीव ट्रीपला आठवत आहे. तिनं या ट्रीपचे काही थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर मजा करतानाचे तिचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत. शेफाली जरीवालाचा हा लूकही सर्वांना आवडत आहे.

या फोटोमध्ये शेफाली बॉडी कॉन ड्रेसमध्ये दिसतेय. तिचा हा बोल्ड बॉडीकॉन ड्रेस फ्रंट स्लिट स्टाईलमध्ये आहे, ज्यामुळे तो आणखीच आकर्षक दिसतोय.

या ड्रेससोबत शेफालीनं हातात आणि कानात गोल्डन ज्वेलरी कॅरी केली आहे.

शेफाली जरीवाला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे चाहते नेहमीच तिच्या फोटोंची आतुरतेनं वाट पाहत असतात.

2002 मध्ये 'कांटा लगा ...' हा म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला तेव्हा शेफाली जरीवाला प्रसिद्धीझोतात आली. तिचं हे गाणं अजूनही प्रसिद्ध आहे. या गाण्यानंतर ती इंडस्ट्रीत आली आणि तिनं 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटात भूमिका साकारली.