- Marathi News Photo gallery Cinema photos Khataro ke khiladi winner hindi tv actress karishma tanna shared photos with husband varun bangera on instagram
Valentine’s Day : करिश्मा तन्नाचा लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे, स्विमिंग पूलमधला फोटो शेअर करत म्हणाली…

आज व्हॅलेंटाईन डे आहे त्या निमित्त अनेक सेलिब्रिटींनी आपल्या प्रियकरासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्री करिश्मा तन्नानेही आपला पती वरूण बंगेरा सोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

करिश्माने तिच्या इन्स्टाग्रामवर स्विमिंग पूलमधला वरूणसोबतचा फोटो शेअर केला आहे. याला तिने "Happy valentines Day baby", असं कॅप्शन दिलं आहे.

खतरों के खिलाडी 10 ची विजेती अभिनेत्री करिश्मा तन्नाने 5 फेब्रुवारीला वरूण बंगेरासोबत लग्नगाठ बांधली. गोव्यातल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तिने सात फेरे घेतले.

करिश्मा मागच्या काही काळापासून वरुण बंगेरासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. या दोघांनी 12 नोव्हेंबर 2021 ला एंगेजमेंट केली आणि यावर्षी 5 फेब्रुवारीला त्यांनी लग्न केलं.

करिश्माने खतरों के खिलाडीचा 10 सिझन जिंकला. तसंच ती बिग बॉसमध्ये देखील होती. तिने नागिनमध्ये देखील काम केलं आहे. तसंच संजू, ग्रँड मस्ती अश्या चित्रपटांमध्येदेखील काम केलंय.