Valentine’s Day : “तू लवकर घरी ये, आपण आपलं आयुष्य आणखी सुंदर बनवूया…”, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मानसी नाईकची पतीला आर्त साद

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 14, 2022 | 10:58 AM
1 / 5
अभिनेत्री मानसी नाईक तिचा पती परदीप खरेरासोबत वेगवेगळे फोटो नेहमी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. आज तर व्हॅलेंटाऊन डे आहे. या प्रेमाच्या दिवशी तर तिने तिच्या पतीसोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे.

2 / 5

मानसीने तिच्या पतीला मिठी मारलेला हा फोटो शेअर केला आहे आणि या फोटोला रोमॅन्टिक कॅप्शनही दिलं आहे.

3 / 5

"एकमेकांचा हात हातात धरून आयुष्यभर सोबत राहुयात... आपण लांब असलो म्हणून काय झालं? तू लवकर ये मी तुझी वाट पाहतेय. हे आयुष्य एकमेकांसोबत खास बनवूयात...", असं कॅप्शन मानसीने या फोटोला दिलं आहे.

4 / 5

मानसी तिच्या पतीसोबत वेगवेगळ्या स्टाईलचं फोटोशूट करताना पहायला मिळते. काही दिवसांआधी तिने साडी नेसून शेतात काढलेले हे फोटो इन्स्टावर शेअर केले होते.

5 / 5

मानसीने मागच्या वर्षी 19 जानेवारीला परदीप खरेरासोबत लग्न केलं. काही दिवसांआधी तिने अॅनिव्हरसरीनिमित्त हे खास फोटो शेअर केले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us