
प्रिया बापट नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते आताही तिने असेच हटके फोटो शेअर केलेत.

प्रियाने निळ्या रंगाच्या साडीतल फोटो शेअर केलेत. या तिच्या फोटोला अनेकांनी पसंती दिली आहे.

तिच्या या फोटोला तिने तितकंच भन्नाट कॅप्शनही दिलं आहे. "मावळत्या सूर्याच्या साक्षीने मोत्यासारखं चमकणारं रूप", असं तिने कॅप्शन दिलं आहे.

तिच्या या फोटोला 23 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट करून फोटो आवडल्याचं म्हटलंय.

प्रियाने काही दिवसांआधी एका कॅफेमध्ये कॉफी पितानाचा फोटो शेअर केला होता.