तुम्हाला सोमवारी कामाचा कंटाळा येतो?, वैदेही परशुरामीचा हा फंडा वापरा आणि व्हा फ्रेश!

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 14, 2022 | 2:38 PM
1 / 5
आपल्यापैकी अनेकांना रविवारी सुट्टी असते त्यामुळे सोमवारी कामाचा कंटाळा येतो. या आळसावर अभिनेत्री वैदेही परशुरामीने एक फंडा सांगितला आहे.

आपल्यापैकी अनेकांना रविवारी सुट्टी असते त्यामुळे सोमवारी कामाचा कंटाळा येतो. या आळसावर अभिनेत्री वैदेही परशुरामीने एक फंडा सांगितला आहे.

2 / 5

वैदेहीने तिच्या इन्स्टाग्रामवर निळ्या रंगाच्या साडीतले काही फोटो शेअर केले आहेत. याला तिने दिलेलं कॅप्शन तुमच्यात सोमवारीदेखील उत्साहाने काम करण्याची उर्मी आणेल.

3 / 5

"तुम्हाला कंफर्टेबल असणारे कपडे घाला आणि एक स्टाँग कॉफी प्या आणि बघा तुम्हाला उत्साह जाणवेल आणि तुमचा सोमवारचा दिवस छोटा झाल्यासारखं वाटेल", असं या फोटोला वैदेहीने कॅप्शन दिलं आहे. तिचा हा मंडे मॉर्निंग फ्रेश करण्याचा फंडा तुमच्याही नक्की उपयोगी येईल.

4 / 5

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिचा 'झोंबिवली' आणि 'लोच्या झाला रे' हे चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटातल्या तिच्या भूमिकांचं सर्वत्र कौतुक होतंय. वैदेही तिच्या इन्स्टाग्रामवर देखील चांगलीच अॅक्टिव्ह असते. आताही तिने असेच हटके फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोवरचं कॅप्शन तुम्हालाही फ्रेश राहण्यास मदत करेन.

5 / 5

'वेड लागी जीवा' या चित्रपटातून वैदेहीने सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. त्यानंतर 'कोकणस्थ', 'वृंदावन', 'सिंबा' या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर या सिनेमातील तिच्या कामाचं विशेष कौतुक झालं. वैदेहीला अभिनयासोबतच नृत्याचीदेखील आवड आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us