
अभिनेत्री मौनी रॉयने टीव्हीनंतर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून तिचा अभिनय सर्वांनाच आवडला आहे.

मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत राहते. मौनीचा ग्लॅमरस अवतार चाहत्यांना खूप आवडतो.

मौनीने आज पुन्हा तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये मौनीने काळ्या आणि सोनेरी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. काही तासांत 2 लाखांहून अधिक लोकांनी तिचे फोटो लाईक केले आहेत.

चाहते आणि सेलिब्रिटी मौनीच्या फोटोंवर रिअॅक्ट होताना दिसत आहेत. ते फोटोंवर कमेंट करत आहे. वरुण धवनने कमेंट केली – फायर. त्याचवेळी अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी पोस्ट केले.