तरुणाईला पडलीये ‘प्रेमाच्या टेस्ट’ची भुरळ, धमाकेदार नवंकोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

| Updated on: Nov 23, 2021 | 1:03 PM

प्रेमात रंगून गेलेल्या प्रियकराला आपले प्रेम मिळते की नाही आणि तेच प्रेम मिळवण्यासाठी प्रियकराचा प्रवास या गाण्यातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या गाण्याचा पॅटर्न हा रेग्युलर गाण्यात मोडणारा नसून, हे गाणे गायक सर्वेश पाटील याने पंजाबी स्टाईलमध्ये गायले आहे.

1 / 5
'प्रेमाच्या टेस्टमध्ये फेल झालो यार..' म्हणत 'पीबीए म्युझिक' प्रस्तुत निर्माते अँजेला आणि तेजस भालेराव निर्मित 'प्रेमाची टेस्ट' हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

2 / 5
प्रेमात रंगून गेलेल्या प्रियकराला आपले प्रेम मिळते की नाही आणि तेच प्रेम मिळवण्यासाठी प्रियकराचा प्रवास या गाण्यातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या गाण्याचा पॅटर्न हा रेग्युलर गाण्यात मोडणारा नसून, हे गाणे गायक सर्वेश पाटील याने पंजाबी स्टाईलमध्ये गायले आहे.

प्रेमात रंगून गेलेल्या प्रियकराला आपले प्रेम मिळते की नाही आणि तेच प्रेम मिळवण्यासाठी प्रियकराचा प्रवास या गाण्यातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या गाण्याचा पॅटर्न हा रेग्युलर गाण्यात मोडणारा नसून, हे गाणे गायक सर्वेश पाटील याने पंजाबी स्टाईलमध्ये गायले आहे.

3 / 5
गायनाच्या जबाबदारीसह सर्वेशने या गाण्याला संगीत दिले असून, हे गाणे लिहिले देखील आहे. तर या गाण्याच्या संगीत संयोजनाची जबाबदारी के सिद्धार्थ यांनी उत्तमरित्या पेलवली आहे. या गाण्याचे चित्रीकरण आणि दिग्दर्शन अशा दोन भूमिका साकारत दिग्दर्शक सचिन घाडगे यांनी योग्य काम केले.

4 / 5
सर्वेशसह या गाण्याचा उत्तम असा कॅनव्हास चितारण्यात धीरज भापकर याचा देखील खारीचा वाटा आहे. क्रिएटिव्ह हेड म्हणून वैभव लोंढे यांनी संपूर्ण गाण्याची बाजू सांभाळली. या गाण्यात गायक सर्वेश पाटील आणि अभिनेत्री काजल कटियार यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

5 / 5
या गाण्याबद्दल बोलताना सर्वेश पाटील असे म्हणाला की, मी पहिल्यांदाच या गाण्यातून अभिनय करणार आहे, मराठी गाण्यांमध्येही मॉडर्न शब्द, स्वर आणि संगीत यांची सांगड असावी असे मला नेहमी वाटायचे. या गाण्यातून प्रेक्षकांसमोर येऊन मी स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.