शाहरुखच्या लेकीची दिवाळी न्यूयॉर्कमध्येच! भाऊ आर्यनला भेटण्याऐवजी मैत्रिणींसोबत धमाल करतेय सुहाना खान

काही दिवसांपूर्वी सुहाना खानबद्दल (Suhana Khan) बातमी आली होती की, तुरुंगातून सुटल्यानंतर भाऊ आर्यन खानला भेटण्यासाठी ती भारतात येणार आहे, मात्र सुहाना अद्याप भारतात आलेली नाही. मात्र, सुहानाचे काही नवीन फोटो समोर आले आहेत, ज्यात ती मैत्रिणींसोबत मस्ती करताना दिसत आहे.

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Nov 08, 2021 | 11:36 AM
1 / 5
काही दिवसांपूर्वी सुहाना खानबद्दल (Suhana Khan) बातमी आली होती की, तुरुंगातून सुटल्यानंतर भाऊ आर्यन खानला भेटण्यासाठी ती भारतात येणार आहे, मात्र सुहाना अद्याप भारतात आलेली नाही. मात्र, सुहानाचे काही नवीन फोटो समोर आले आहेत, ज्यात ती मैत्रिणींसोबत मस्ती करताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी सुहाना खानबद्दल (Suhana Khan) बातमी आली होती की, तुरुंगातून सुटल्यानंतर भाऊ आर्यन खानला भेटण्यासाठी ती भारतात येणार आहे, मात्र सुहाना अद्याप भारतात आलेली नाही. मात्र, सुहानाचे काही नवीन फोटो समोर आले आहेत, ज्यात ती मैत्रिणींसोबत मस्ती करताना दिसत आहे.

2 / 5

सुहानाचे हे फोटो तिच्या एका मैत्रिणीने इन्स्टाग्रामवर शेअर केले असले तरी, ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3 / 5

यापूर्वी सुहानाने मित्रपरिवारासोबत हॅलोवीन पार्टी केली होती. सुहाना दरवर्षी दिवाळीला घरी यायची, पण यावेळी ती भारतात आलेली नाही.

4 / 5

सुहाना सध्या शिक्षण घेत आहे, पण तिचे लक्ष अभिनय विश्वात प्रवेश करण्यावर आहे. तिला अभिनेत्री व्हायचे आहे, याचा खुलासा खुद्द शाहरुख खानने केला होता.

5 / 5

सुहानाने अद्याप बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले नसले, तरी सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोअर्सची यादी कमालीची आहे. इंस्टाग्रामवर सुहानाचे 2.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us