
टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या बोल्ड फोटोंमुळे खूप चर्चेत असते. अभिनेत्री बिग बॉस ओटीटीचा देखील एक भाग होती. नुकतेच तिने ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यावर डान्स करून आणि साडीतील हॉट फोटो शेअर करून चाहत्यांना अक्षरशः घायाळ केले आहे.

उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पिवळी साडी परिधान केलेले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कतरिनाची कॉपी करताना दिसली आहे.

उर्फीने तिच्या अलीकडच्या 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यातील कतरिना कैफसारखी साडी नेसत हॉटनेसचा जलवा दाखवला होता. उर्फीचे सोशल मीडिया अकाउंट अशा बोल्ड आणि हॉट फोटोंनी भरलेले आहे.

उर्फीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यासोबतच तिच्या पोस्टवर अनेक कमेंट्स देखील येत आहेत.

उर्फीचे हे लेटेस्ट फोटो साडीत असले तरी तिने आपला बोल्डनेस दाखवण्याची संधी सोडलेली नाही. उर्फी जावेद ही एक टीव्ही स्टार आहे, जी बिग बॉस ओटीटीचा एक भाग होती आणि सुरुवातीच्या काळातच घराबाहेर झाली होती.