
अभिनेत्री रसिका सुनील तिच्या चाहत्यांच्या मनात अढळ स्थान आहे. तिचे फोटो अनेकांच्या हृदयाचा ठाव घेतात.

आताही रसिका सुनीलने हटके फोटो इन्साग्रामवर शेअर केले आहेत आणि अनेकांचं लक्ष वेधलं आहे

रसिकाने निळ्या रंगाचा ब्लाऊज आणि त्यावर शॉर्ट घालून फोटो काढलेत. हे फोटो सध्या चर्चेत आहेत.

रसिकाने या फोटोंना "चांगल्या गाण्यावर बंद खोलीत एकट्याने डान्स करण्याची मजाच वेगळी आहे. तुम्ही केला नसेस तर ट्राय करून बघा", असं कॅप्शन दिलं आहे.

रसिकाची ही नवी आणि हटके स्टाईल अनेकांना आवडली आहे. तर काहींनी तिच्या या फोटोवरून तिला प्रश्न विचारलेत.

एका नेटकऱ्याने 'खोलीत एकटी आहेस तर मग फोटो कोण काढतंय?', असा खोचक सवाल केलाय.

रसिका सुनीलचे हे फोटो तुम्हाला कसे वाटले? हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा...