Dating Apps चा वापर धोकादायक ! 70% युजर्स डिप्रेशनचे बळी, संशोधनातून खुलासा

| Updated on: Feb 09, 2023 | 3:24 PM

टिंडर, बंबलसह अशी अनेक डेटिंग ॲप्स आहेत, ज्यावर युजर्स बराच वेळ स्वाइप करण्यात गुंतलेले असतात. नुकत्याच जाहीर झालेल्या एका संशोधनातून डेटिंग ॲप्स वापरण्याची वेळ आणि त्याचे परिणाम समोर आले आहेत. डेटिंग ॲप्सबद्दल संशोधन काय सांगते ते जाणून घेऊया.

1 / 5
 जोडीदाराचा शोध घेण्यासाठी अनेक डेटिंग ॲप्स ही तरुणांची खास पसंती बनली आहेत. टिंडरपासून बंबलपर्यंत, अशी अनेक डेटिंग ॲप्स आहेत जिथे तरूण-तरूणी स्वाइप करून पार्टनरचा शोध घेत असतात. पण व्हर्च्युअल जगातील या (ऑनलाइन) प्लॅटफॉर्मचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत.

2 / 5
एका संशोधनानुसार, डेटिंग ॲप्सवरील युजर्स दररोज सुमारे 55 मिनिटे स्वाइप करण्यात घालवतात. या पद्धतीमुळे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते, असे संशोधकांना आढळून आले. या अभ्यासानुसार, सुमारे 70 टक्के लोक असे आहेत ज्यांना डेटिंग ॲप्सचा वापर केल्यानंतर नैराश्य (Depression)आणि चिंता (Anxiety) यांसारख्या मानसिक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये  39 टक्के लोक उठल्यानंतर या ॲप्सचा वापर करतात, तर 48 टक्के लोक झोपण्यापूर्वी डेटिंग ॲप्सवर वेळ घालवतात.

3 / 5
 या संशोधनात सुमारे एक हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता आणि 44 टक्के असे युजर्स होते ज्यांना शारीरिक संबंधांची अधिक इच्छा होती. त्याच वेळी, यापैकी 27 टक्के महिला किंवा मुलींनी त्यांचा इगो बूस्ट करण्यासाठी या ॲप्सचा वापर केल्याचे दिसून आले.

4 / 5
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ॲप्सवर एक व्यक्ती एकाच वेळी 6 लोकांशी बोलत असते. संशोधन करणाऱ्या डॉक्टरांपैकी एकाने अनेक महत्वपूर्ण माहिती शेअर केली. संपूर्ण संशोधनात, असे 44 टक्के युजर्स आढळले, जे त्यांच्याशी मॅच होणाऱ्या पार्टनरच्या पर्सनॅलिटीबद्दल अथवा त्याच्या व्यक्तीमत्वाबद्दल नाखूष होते.

5 / 5
 डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, डेटिंग ॲप्ससारखे नवीन तंत्रज्ञान आपल्यावर वर्चस्व गाजवत आहे. आपल्याला याचे व्यसन लागले आहे समजूनही अनेक जण या ॲप्सवर तासन्तास वेळ घालवतात