
पाणी आणि सोलार एनर्जीनंतर आता हवेतून वीज निर्मिती केली जाणार आहे. पवनचक्की तर हवेच्या वेगाने फिरते त्या माध्यमातून वीज निर्मिती होते. पण हवेतून नवं संशोधन आता पुढे आलं आहे.वीज निर्मिती करणाऱ्या संशोधकांचा दावा आहे की, यामुळे 24 वीज मिळणार आहे. (Photo : Euronews)

शास्त्रज्ञांनी एक खास डिव्हाईस विकसित केलं आहे. हे डिव्हाईस हवेच्या माध्यमातून वीज तयार करण्यास सक्षम आहे. हवेत काय आर्द्रता असते. नवीन उपकरण त्यातून वीज निर्मिती करणार आहे. वीज निर्मितीच्या या पद्धतीमुळे पर्यावरणाची हानी टळणार आहे. (Photo : Euronews)

हवेतील आर्द्रतेत पाण्याचे सूक्ष्म थेंब असतात. प्रत्येक थेंबात वीज निर्मितीची शक्ति असते. शास्त्रज्ञांनी सुरुवातीला छोट्या प्रमाणात वीज निर्मिती केली आहे. डिव्हाईसमध्ये 100 नॅनोमीटरपेक्षा कमी छीद्र आहेत. या माध्यमातून वीज निर्मिती करण्यास मदत होते. (Photo : Euronews)

शास्त्रज्ञांच्या मते, हवेतील आर्द्रतेत मॉलिक्यूल असतात. हवा जेव्हा डिव्हाईसमधील 100 नॅनोमीटरपेक्षा कमी छिद्रातून पास होतात. तेव्हा ते मॉलिक्यूल इलेक्ट्रिकल चार्ज तयार करतात. याला जेनेरिक एअर जेन इफेक्ट असं बोललं जातं. या कॉन्सेप्टवर नवं डिव्हाईस काम करते. (Photo : Euronews)

शास्त्रज्ञ शियाओ लियूच्या मते, हे संशोधन भविष्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचं आहे. आतापर्यंत वीज निर्मितीसाठी असं संशोधन झालं नव्हत. आम्ही या संशोधनाच्या माध्यमातून क्लिन इलेक्ट्रिसिटी तयार करण्याचा मार्ग शोधला आहे. या माध्यमातूनकार्बन उत्सर्जन होणार नाही. त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होण्याचा प्रश्नच नाही. (Photo : Euronews)