
मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा गाजलेला चित्रपट म्हणजेच ‘फँड्री’मध्ये सोज्वळ चेह-याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव असते.

ती चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. आता तिनं काही हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शालू म्हणजेच राजेश्वरी खरात तिच्या हॉट फोटोंनी नेहमीच चाहत्यांना घायाळ करते. तिचा हा हटके अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडलाय.

शालूनं अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी जागा बनवली मात्र आता तिचे हे लूक्स चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.

राजेश्वरी मुळची पुण्यातली आहे. मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी तिला ज्यावेळी ‘फँड्री’ चित्रपटाची आॅफर दिली होती त्यावेळी तिने चित्रपट करण्यासाठी नकार दिला होता कारण त्यावेळी दहावीत शिकत होती. नागराज मंजुळेना फँड्री चित्रपटात जो चेहरा पाहिजे होता तो त्यांना राजेश्वरीच्या रूपाने मिळाला. राजेश्वरीने देखील आपल्या उत्तम अभिनयातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, फँड्री शालूचे आताचे रूप पाहिले की चाहत्यांना विश्वासच बसत नाही.