Photo : लग्नानंतर फरहान आणि शिबानी पहिल्यांदाच माध्यमांसमोर, मिठाईचं वाटप आणि खास फोटोशूट

मराठमोळी शिबानी दांडेकरने ब्युटी आणि सिम्प्लीसिटीची नवी ओळख तिच्या लग्नातल्या लुकद्वारे करून दिली. फ्लोरी फुल ब्लाउस, पीच कलरची तिची साडी वेगळीच आकर्षित करून जात आहे. शिबानी आणि फरहान जोडीने साजेसा असा ड्रेस लूक केलेला पहायला मिळत आहे. हेवी ज्वेलरी आणि सिंपल हेअर स्टाइल मध्ये शिबानी फारच खुलून दिसत आहे.

sagar joshi | Updated on: Feb 21, 2022 | 7:50 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि मराठमोळी अभिनेत्री आणि मॉडेल शिबानी दांडेकर नुकतेच विवाहबंधनात अडकले. मागील अनेक वर्षांपासून हे दोघे रिलेशनमध्ये होते आणि त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चाही सुरु होती. 19 फेब्रुवारी रोजी अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीत फरहान आणि शिबानीचा विवाह पार पडला.

2 / 5

फरहान अख्तर आणि मॉडेल-अभिनेत्री शिबानी दांडेकर हे मागच्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. ते दोघे अनेकदा एकत्र दिसायचे. त्याचे एकमेकांसोबत सोशल मीडियावर फोटोही शेअर करताना दिसतात.आता हे दोघे लग्नबंधनात अडकले आहेत.

3 / 5

त्यानंतर आज फरहान आणि शिबानी यांनी माध्यम प्रतिनिधींना खास मिठाईचं वाटप केलं आणि खास फोटोही दिले. यावेळी हे नवदाम्पत्य अधिक आकर्षक दिसत आहे. शिबानीचा रोझ गोल्ड लूक आणि फरहानचा देशी अवतार त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल असा आहे.

4 / 5

मराठमोळी शिबानी दांडेकरने ब्युटी आणि सिम्प्लीसिटीची नवी ओळख तिच्या लग्नातल्या लुकद्वारे करून दिली. फ्लोरी फुल ब्लाउस, पीच कलरची तिची साडी वेगळीच आकर्षित करून जात आहे. शिबानी आणि फरहान जोडीने साजेसा असा ड्रेस लूक केलेला पहायला मिळत आहे. हेवी ज्वेलरी आणि सिंपल हेअर स्टाइल मध्ये शिबानी फारच खुलून दिसत आहे.

5 / 5

बायको शिबाणीच्या साडीशी मिळता जुळता ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता आणि ट्रेण्ड मध्ये असलेले मोदी जॅकेट घातले आहे. रब ने बनादी जोडी अशी चाहत्यांची दोघांच्या लग्नातील कार्यक्रमातील फोटोंना पाहून देत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us