वसंत बहरला… राज्यातील या महामार्गावर गिरीपुष्पांमुळे जणू कॅलिफोर्नियाचीच अनुभूती

मराठवाडा व खान्देशच्या सीमेवर असलेल्या अजिंठा डोंगरात वसंत ऋतूमध्ये विविध फुले फुलली आहेत. घाटातून जाताना दोन्ही बाजूचे डोंगर फुलांनी बहरले आहे. राखीव जंगलात 300 हेक्टरवर गिरीपुष्प फुलांची लागवड करण्यात आली आहे.

| Updated on: Feb 11, 2025 | 10:23 AM
1 / 5
अजिंठा डोंगरात वसंत ऋतूमध्ये विविध फुले फुलली आहेत. घाटातून जाताना दोन्ही बाजूचे डोंगर फुलांनी बहरले आहेत. काही वर्षांपूर्वी डोंगरातील जमिनीची धूप थांबवण्यासाठी वन विभागाने डोंगरावर गिरीपुष्प (ग्लिरिसिडिया सेपियम) ही विदेशी झाडे लावली होती.

2 / 5
गेल्या दहा वर्षांत संपूर्ण डोंगररांगेत या झाडांचा प्रसार झाला आहे. दाट पाने असलेल्या या झाडाला स्थानिक भाषेत उंदीरमारी असेही म्हटले जाते. मूळचे उत्तर अमेरिका, मेक्सिको येथील प्रजातीचे हे झाड १० फुटांपासून ४० फुलांपर्यंत वाढते.

3 / 5
वसंत ऋतूमध्ये या झाडांना सर्वात प्रथम फुले येतात. फुलांचा कालावधी तीन आठवडे ते एक महिन्यापर्यंत असतो. सध्या संपूर्ण अजिंठा डोंगर या फुलांमुळे आकर्षित दिसतो आहे. गुलाबी, जांभळा, पांढऱ्या आणि पिवळ्या छटा असलेली ही फुले सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

4 / 5
अजिंठा राखीव जंगलात ३०० हेक्टरवर यांची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला या झाडांची अजिंठ्याच्या राखीव जंगलातच लागवड करण्यात आली होती. ती वाढल्यानंतर हा परिसर नयनरम्य दिसत आहे.

5 / 5
गिरीपुष्प ही झाडे कन्नड, सोयगाव, चाळीसगाव जंगलातही लावण्यात आलेली आहेत. या झाडाची फांदी तोडून लावली तरीही ती उगवते. विशेष म्हणजे कमी पाण्यात झाड जगते. खडक, मातीमिश्रित व खडकाळ जागेतही उगवते.