GK : भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? निसर्ग सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

India GK : भारतात 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, आज आपण यातील सर्वात छोट्या केंद्रशासित प्रदेशाची माहिती जाणून घेणार आहोत. हा भारताचा सर्वात सुंदर भाग आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Apr 13, 2026 | 11:16 PM
1 / 5
क्षेत्रफळ आणि विस्तार : लक्षद्वीप हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. याचे एकूण क्षेत्रफळ केवळ 32 वर्ग किलोमीटर असून हा 36 लहान-मोठ्या बेटांचा समूह आहे.

2 / 5
भौगोलिक रचना : या द्वीपसमूहामध्ये 12 प्रवाळ बेटे (Atolls), 3 रीफ्स आणि 5 जलमग्न बँक्सचा समावेश आहे. या 36 बेटांपैकी केवळ 10 बेटांवर लोकवस्ती आहे.

3 / 5
राजधानी आणि प्रशासन : लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती ही आहे. हा संपूर्ण केंद्रशासित प्रदेश एकच जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि एका खासदाराद्वारे लोकसभेत त्याचे प्रतिनिधित्व केले जाते.

4 / 5
नैसर्गिक सौंदर्य : हे ठिकाण आपल्या पांढऱ्या शुभ्र वाळूच्या समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि हिरव्यागार निसर्गासाठी प्रसिद्ध आहे. हे सर्व बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेले असून पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत आकर्षक आहे.

5 / 5
प्रमुख भाषा आणि संस्कृती: लक्षद्वीपमधील बहुतांश लोकसंख्या मल्याळम ही भाषा बोलते. या बेटांचे सांस्कृतिक जीवन केरळ राज्याशी आणि तिथल्या परंपरांशी मिळतेजुळते आहे.

Follow Us