GK : लाखो लोकांची तहान भागवत 11 देशांमधून वाहणारी नदी कोणती?
World Longest River : पृथ्वीवरील नद्या संपूर्ण जगाला पिण्याचे पाणी पुरवतात आणि अनेक देशांची तहान भागवतात. आपल्या पृथ्वीवर एक अशी नदी आहे जी इतक्या देशांतून वाहते की जिच्यामुळे लाखो लोकांची तहान भागते. या नदीचा माहिती जाणून घेऊयात.

सर्वाधिक देशांमधून वाहणारी नदी : पृथ्वीवर अनेक नद्या वाहतात. बहुतेक नद्या एक-दोन देशांतून वाहतात, पण एक नदी अशी आहे जी एक-दोन नव्हे तर तब्बल अनेक देशांतून प्रवाहित होते.

जगातील सर्वात लांब नदी : आपण ज्या नदीबद्दल बोलत आहोत ती म्हणजे जगातील सर्वात लांब नदी - नाईल नदी. शालेय विद्यार्थ्यांनादेखील माहित असते की जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी आहे. तिची लांबी इतकी प्रचंड आहे की ती अनेक देशांतून वाहते.

किती देशांतून वाहते ही नदी? : जगातील ही सर्वात लांब नदी एक-दोन नव्हे तर तब्बल 11 देशांतून वाहते. तिचे नदीखोरे 11 देशांमध्ये पसरलेले आहे. या नदीमुळे शेतीला मोठा फायदा होतो.

हे आहेत ते देश : नाईल नदी बुरुंडी, रवांडा, टांझानिया, युगांडा, कांगो, केन्या, इथिओपिया, इरेत्रिया, दक्षिण सुदान, सुदान आणि इजिप्त या देशांमधून वाहते.

नाईल नदीची लांबी किती? : नाईल नदीची एकूण लांबी सुमारे 6,650 किलोमीटर (4,130 मैल) आहे. ही नदी मुख्यतः व्हाईट नाईल आणि ब्लू नाईल या दोन प्रमुख प्रवाहांनी बनलेली आहे.