GK : हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर, कोट्यवधींची होते उलाढाल

World No Tobacco Day : तंबाखू आणि धूम्रपानामुळे मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतो. याबाबत जनजागृती करण्यासाठी 31 मे रोजी जगभरात ‘जागतिक तंबाखू निषेध दिन’ साजरा केला जात आहे. मात्र आज आपण भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त तंबाखूचे उत्पादन होते ते जाणून घेऊयात.

| Updated on: May 31, 2026 | 3:44 PM
1 / 5
भारतामध्ये तंबाखू उत्पादनात आंध्र प्रदेश अव्वल स्थानावर आहे. हे राज्य विशेषतः उच्च दर्जाच्या ‘व्हर्जिनिया तंबाखू’च्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या तंबाखूचा वापर मुख्यतः सिगारेट तयार करण्यासाठी केला जातो. देशातील एकूण तंबाखू उत्पादनापैकी सुमारे 20 ते 22 टक्के उत्पादन आंध्र प्रदेशात होते.

2 / 5
गुजरात राज्य बीडी आणि चघळण्याच्या तंबाखूच्या उत्पादनासाठी ओळखले जाते. देशातील विविध भागांत वापरल्या जाणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांच्या पुरवठ्यात गुजरातची मोठी भूमिका आहे. या प्रकारच्या तंबाखू उत्पादनात गुजरातचा सुमारे 45 टक्के वाटा आहे.

3 / 5
भारतामध्ये सिगारेटसाठी वापरल्या जाणाऱ्या तंबाखूचे दुसरे सर्वात मोठे उत्पादक राज्य म्हणजे कर्नाटक. येथे ‘फ्ल्यू क्युअर्ड व्हर्जिनिया’ तंबाखूची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. अनेक मोठ्या तंबाखू कंपन्या या तंबाखूचा वापर करतात.

4 / 5
उत्तर प्रदेश आणि बिहार ही राज्ये खैनी, जर्दा आणि हुक्का तंबाखूसाठी प्रसिद्ध आहेत. उत्तर भारतात या उत्पादनांचे सेवन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

5 / 5
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्हा हा देशातील सर्वात मोठ्या तंबाखू उत्पादक भागांपैकी एक मानला जातो. भारत सरकारचे केंद्रीय तंबाखू मंडळही या ठिकाणी आहे. (तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे, आम्ही तंबाखूचे सेवन करण्याचा सल्ला देत नाही)

Follow Us