

नववर्षाचं सेलिब्रेशन करायला ही जोडी गोव्यात पोहोचली आहे. काही मित्र-मैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत मलायका आणि अर्जुन सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

आपल्या फिटनेसबाबत नेहमी सतर्क असणारी मलायका अरोरा बर्याचदा योगाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. मलायका आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देते. म्हणूनच ती आजही अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय.


मलायका अगदी नियमितपणे योग आणि अन्य एक्सरसाईज करते. वर्कआऊट करताना ती आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियातील विविध प्लॅटफॉर्म्सवर टाकत असते. यापूर्वीही मलायकाने एक एस्करसाईजचा एक खास व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती डान्स करताना दिसून येत होती.

या व्हेकेशनमध्ये अर्जूनही मस्त फोटोशूट करतोय.