Surya Namaskar Benefits | लॉकडाऊनमध्ये घरीच रहा आणि सूर्य नमस्कार करा! शारीरिक आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

| Updated on: May 13, 2021 | 3:52 PM

Surya Namaskar Benefits : कोरोना विषाणूची दुसरी लाट अत्यंत धोकादायक ठरत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकासाठी तंदुरुस्त राहणे आणि निरोगी आहार घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. अशा वेळी नियमित व्यायाम करावा. यासाठी आपण घरच्या घरी सूर्य नमस्कार देखील करू शकता.

1 / 5
रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर : सूर्याकडे तोंड करून नियमित सूर्य नमस्कार करा. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. मुलांनीही नियमित सूर्यनमस्कार करावे. यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत होते.

2 / 5
हाडे मजबूत होतात : सूर्य नमस्कार केल्याने हाडे मजबूत होतात. यामुळे मणक्याचे हाड मजबूत राहते. व्यायामादरम्यान ताणल्याने स्नायूही निरोगी राहतात.

3 / 5
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर : सूर्यनमस्कारामुळे वजन देखील कमी करता येते. हा व्यायाम नियमित केल्याने पोटावरची चरबी कमी होते.

4 / 5
डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त : सूर्यनमस्कार दरम्यान वायु श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे रक्तामध्ये ऑक्सिजन व्यवस्थित पोहचतो. यामुळे शरीराला डिटॉक्स करण्यात मदत होते.

5 / 5
ताण कमी होतो : सूर्य नमस्कार मज्जासंस्था शांत ठेवतात. यामुळे मेंदूची एकाग्रता वाढते. यामुळे ताण कमी होतो.