Birthday Special: ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनींचा वाढदिवस; जाणून घ्या त्यांच्या फिटनेसचं रहस्य!

हेमा मालिनी या स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा, सायकलिंग आणि हेल्दी डायट फॉलो करतात. (Hema malini's 72th birthday, still fit and beautiful)

VN | Updated on: Oct 16, 2020 | 2:25 PM
1 / 5
बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचा आज 72वा वाढदिवस आहे. आजही हेमा मालिनी (Hema Malini) डान्स, अभिनय क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या सौंदर्यातही तसूभरही कमतरता आलेली नाही. आजही मोठ्या स्क्रिनवर सक्रिय असल्याने त्यांची फॅनफॉलोइंग जबरदस्त आहे.

2 / 5

हेमा मालिनी या स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा, सायकलिंग आणि हेल्दी डायट फॉलो करतात. तुम्हालाही त्यांच्या सारखं सुंदर दिसायचं असेल आणि फिट राहायचं असेल तर त्यांच्या डायट आणि एक्सरसाइज प्लॅनला फॉलो करू शकता.

3 / 5

त्या आजही उत्तम डान्स करतात. आपल्या मुलींसोबत त्यांनी अनेकदा स्टेज शेअर केला आहे. हेमा या डान्स व्यतिरिक्त योगावर विशेष लक्ष देतात. त्या रोज सकाळी 45 ते 50 मिनिटं योगा करतात. सोबतच त्या रोज 20 ते 25 मिनिटं सायकलिंग करतात.

4 / 5

फिटनेससाठी व्यायामासोबतच हेल्दी डायटही महत्वाचं आहे, असं त्या नेहमी सांगतात. एवढंच नव्हे तर त्या नित्यनियमानं डायट फॉलो करतात. त्या घरगुती आणि व्हेजिटेरीयन पदार्थांचं सेवन करतात.

5 / 5

भरपूर पाणी पिण्यावर त्यांचा नेहमी भर असतो. चमकदार त्वचेसाठी भरपूर पाणी महत्त्वाचं असल्याचं ते वारंवार सांगत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us