PHOTO | बंगळुरुचा कर्णधार कोहलीचा ‘विराट’ विक्रम

| Updated on: Oct 16, 2020 | 4:37 PM

असा विक्रम करणारा विराट हा एकमेव खेळाडू ठरला आहे.

1 / 4
आयपीएलच्या 13 व्या पर्वातील 31 वा सामना गुरुवारी (15 ऑक्टोबर) पंजाब विरुद्ध बंगळुरु यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने एक विक्रम केला आहे.

2 / 4
बंगळुरुकडून खेळताना पंजाबविरुद्धचा हा सामना विराटचा 200 वा सामना ठरला. असा विक्रम करणारा विराट हा एकमेव खेळाडू ठरला आहे. विराटने आयपीएलमध्ये 185 तर चॅम्पियन लीगमध्ये 15 असे एकूण 200 सामने खेळले आहेत.

3 / 4
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराटच्या नावावर आयपीएलमध्ये  5 हजार 716 धावांची नोंद आहे. तर यापैकी कर्णधार म्हणून त्याने 4 हजार 314 धावा केल्या आहेत.

4 / 4
विराटने यंदाच्या 13 व्या मोसमातील 8 सामन्यात 304 धावा केल्या आहेत. बंगळुरु पॉइंट्सटेबलमध्ये 10 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इतर पर्वांच्या तुलनेत या पर्वात बंगळुरु दमदार कामगिरी करत आहे. बंगळुरु पुढील सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध 17 ऑक्टोबरला खेळणार आहे.