Brown sugar खरंच हेल्दी असते का ?

| Updated on: Dec 13, 2022 | 5:24 PM

1 / 5
साखर हा एक अनहेल्दी पदार्थ मानला जातो, त्याचे अनेक दुष्परिणाम असतात. त्यामुळे अनेक लोकं साखरेऐवजी ब्राऊन शुगरचा पर्याय निवडतात. गोड खाण्यासाठी ब्राऊन शुगरचा वापर करणे ट्रेंडमध्ये आहे. पण ही प्राऊन शुगर खरंच इतकी हेल्दी, आरोग्यदायी आहे का ?

2 / 5
आपली नेहमीची पांढरी साखर आणि ब्राऊन शुगर यांच्यात चव, रंग आणि त्यांच्यावर करण्यात येणारी प्रक्रिया यामध्ये फरक आहे. पण दोन्हीमध्ये कॅलरी आणि पोषक घटक समान असतात. जर तुम्ही पांढऱ्या साखरेइतकीच ब्राऊन शुगर खात असाल तर तो आरोग्याशी खेळ ठरतो, असे तज्ज्ञ सांगतात.

3 / 5
या दोन्ही साखर सुरुवातीला सारख्याच पद्धतीने बनवल्या जातात, पण पांढऱ्या साखरेत जास्त रसायने वापरली जातात. सर्वप्रथम उसाचा रस काढून गूळ तयार केला जातो. त्यातूनच ब्राऊन शुगर बाहेर येते, पण पांढऱ्या साखरेत जास्त रसायने वापरली जातात.

4 / 5
पांढरी साखर व ब्राऊन शुगर या दोघांच्या पोषक तत्वांबद्दल बोलायचे तर, त्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. पण ब्राऊन शुगरमध्ये लोह, कॅल्शिअम, झिंक आणि तांबे हेही असते.

5 / 5
जर तुम्हाला पांढरी साखर व ब्राऊन शुगर यांच्याऐवजी तिसरा पर्याय हवा असेल तर तुम्ही कोकोनट शुगर किंवा गुळाचा वापर करू शकता. बहुतांश ठिकाणी ते आजही नैसर्गिक पद्धतीने तयार केले जाते.