जिओच्या ग्राहकांची बल्ले बल्ले! कंपनीने आणले 4 खास प्लॅन
Jio Recharge : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओचे अंदाजे 52 कोटी ग्राहक आहेत. आपल्या ग्राहकांसाठी कंपनीने खास 4 प्लॅन आणले आहेत, याची माहिती जाणून घेऊयात.

स्वस्त प्लॅन्सवर लक्ष : जिओने आपल्या ग्राहकांसाठी असे काही प्लॅन्स सादर केले आहेत, जे कमी किमतीत दररोज डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचे फायदे देतात.

189 रुपयांचा प्लॅन : हा जिओचा सर्वात स्वस्त प्लॅनपैकी एक आहे. यामध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह एकूण 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 50 एसएमएस मिळतात. हा प्लॅन प्रामुख्याने सिम कार्ड चालू ठेवण्यासाठी उत्तम आहे.

249 रुपयांचा प्लॅन : जर तुम्हाला दररोज डेटा हवा असेल, तर हा प्लॅन चांगला पर्याय आहे. यामध्ये 28 दिवसांसाठी दररोज 1 जीबी डेटा (एकूण 28 जीबी) आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते.

299 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. ज्यांना सोशल मीडिया आणि ब्राउझिंगसाठी जास्त डेटा लागतो, त्यांच्यासाठी हा लोकप्रिय प्लॅन आहे.

349 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. याची वैधता 28 दिवसांची असून, यात अनलिमिटेड कॉलिंगसोबतच जिओ ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शनही मिळते.