Photo : कंगना इज बॅक इन अॅक्शन, चित्रीकरणाची तयारी सुरू
कंगना ‘तेजस'मध्ये भारतीय वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकाची भूमिका साकारणार आहे. (Kangana will play the role of an Indian Air Force fighter pilot.)
1 / 5

अभिनेत्री कंगना रनौत सध्या पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये व्यस्त झाली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत चित्रीकरणावर परतत असल्याची माहिती दिली आहे.
2 / 5

तिने एक व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये कंगना ‘बॉक्सिंग’चे प्रशिक्षण घेताना दिसत आहे. ‘मी माझ्या आगामी अॅक्शन चित्रपट ‘तेजस’ आणि ‘धाकड’साठी ट्रेनिंग सुरू केली आहे, असं तिने म्हटलं आहे.
3 / 5

या दोन चित्रपटांपैकी एका सिनेमात ती सैनिकाची आणि दुसऱ्यात गुप्तहेराची भूमिका साकारत आहे.
4 / 5

कंगना तिच्या आगामी ‘तेजस’ या चित्रपटामध्ये भारतीय वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
5 / 5

‘तेजस’ आणि ‘धाकड’पूर्वी कंगना ‘थलायवी’ चित्रपटात तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
Follow Us