Covid and Asthma: दम्याच्या रुग्णांवर कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा दुहेरी हल्ला? सुरक्षित राहण्याचे सोपे उपाय

| Updated on: Apr 19, 2021 | 4:53 PM

कोरोनाने देशभरात थैमान घातलंय. कोरोनाचे नवनवे स्ट्रेन तयार होत आहेत. आता दुसऱ्या कोरोना लाटेत या नव्या स्ट्रेनचा धोका वाढलाय.

1 / 6
कोरोनाने देशभरात थैमान घातलंय. कोरोनाचे नवनवे स्ट्रेन तयार होत आहेत. आता दुसऱ्या कोरोना लाटेत या नव्या स्ट्रेनचा धोका वाढलाय. या नव्या स्ट्रेनने अनेकांचा बळी घेतलाय. विशेषतः ज्यांना आधीचे वेगळे आजार आहेत त्यांचा धोका वाढलाय. यापैकीच एक म्हणजे दम्याचा आजार असणारे रुग्ण (Astma Patient and Corona). म्हणूनच या रुग्णांनी अधिक सतर्कता बाळगणं महत्त्वाचं आहे.

2 / 6
दम्याचा आजार असणाऱ्या रुग्णासाठी कोरोना विषाणूचा संसर्ग जीवघेणा असल्याचं बोललं जातं. मात्र, तज्ज्ञांच्या मते दम्याचा आजार असणाऱ्या रुग्णांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता अधिक नाही.

3 / 6
प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

4 / 6
दम्याचे रुग्ण इनहेलरचा वापर करत असल्याने त्यांना कोरोनाचा सामना करण्यात मदत होते. इलहेलरचा वापर केल्याने दम्याच्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं गंभीर स्थितीत जात नाही.

5 / 6
काही दिवसांपूर्वीच वैद्यकीय संशोधन मासिक लँसेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन अहवालात म्हटलंय की दम्याच्या रुग्णांना घरी घेण्यासाठी दिलेली औषधं सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाशी सामना करण्यात एक प्रभावी औषध आहे.

6 / 6
corona viएकूणच दम्याची औषधं कोरोनाची लक्षणं कमी करण्यास मदत करत असल्याने दम्याच्या रुग्णांना कोरोना संसर्गाचा धोका इतरांपेक्षा कमी असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.rus