Travel Special | डोंगरांच्या गर्द झाडीत लपलाय अध्यात्माचा वारसा, देवी मातेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भारतातील या अप्रतिम देवळांना नक्की भेट द्या

प्रत्येकालाच वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आवड असतेच असं नाही तर पण जिथे देवाचा विषय येतो तेव्हा त्या स्थळांना भेट देण्यासाठी अनेक जण तयार होतात, भारतातील बरीच देवस्थाने डोंगरावरील शांतता आणि सौंदर्य वसलेले असते.चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ही स्थळे.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Dec 02, 2021 | 3:49 PM
1 / 6
भारतात अशी अनेक देवळे आहेत, जी शक्तीपीठे म्हणून ओळखली जातात. ही देवळे गुहा, डोंगर आणि घनदाट जंगलात वसलेली आहेत. ही सर्व मंदिरे अत्यंत पूजनीय आहेत. चला जाणून घेऊया, डोंगरावर असलेल्या देवीच्या मंदिरांबद्दल.

भारतात अशी अनेक देवळे आहेत, जी शक्तीपीठे म्हणून ओळखली जातात. ही देवळे गुहा, डोंगर आणि घनदाट जंगलात वसलेली आहेत. ही सर्व मंदिरे अत्यंत पूजनीय आहेत. चला जाणून घेऊया, डोंगरावर असलेल्या देवीच्या मंदिरांबद्दल.

2 / 6

नाशिक येथे असणारे सप्तशृंगी देवीचे मंदिर. दरवर्षी लाखो भाविक मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे येतात. सप्तशृंगी म्हणजे सात पर्वतशिखरांमध्ये राहणारी माता. हे स्थान ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे.

3 / 6

निलांचल टेकडीवर 20 मंदिरे आहेत त्यापैकी एक कामाख्या देवीचे मंदिर आहे. कामाख्या मंदिर हे दुर्गा मातेचे अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. या मंदिरात दोन कोठडी, तीन मंडप आणि गर्भगृह आहे, असे मानले जाते की माता सतीची योनी गर्भगृहात पडली होती.या ठिकाणी तंत्रमंत्र यांसारख्या गोष्टी मोठ्या प्रमामात होतात.

4 / 6

मनसा देवी मंदिर हरिद्वारमध्ये आहे. हे मंदिर भिलवा डोंगरावर आहे. मनसादेवीसमोर जी काही प्रार्थना केली जाते ती पूर्ण होते. या मंदिराजवळच चंडी देवीचे मंदिरही आहे.

5 / 6

नैना देवी मंदिर हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे आहे. नवरात्र आणि श्रावण अष्टमीच्या काळात येथे भाविकांची मोठी रांग असते. येथे भाविक रस्त्याने किंवा केबल कारने जाऊ शकतात.

6 / 6

वैष्णोदेवी मंदिर प्रत्येक भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. हे दुर्गामातेचे सर्वात प्रसिद्ध मंदिर मानले जाते. जम्मूच्या त्रिकुटा पर्वतावर असलेल्या वैष्णोदेवी मंदिरात मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us