
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) सध्या न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत आहे.यासर्वमध्ये मिळणाऱ्या मोकळ्या वेळेत ती तिच्या मित्र मैत्रींसोबत मजा करातानासुद्धा पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी तिने इंस्टाग्राम स्टोरीजवर काही फोटो शेअर केले होते. हे फोटो तिथे होणाऱ्या पार्टीचे आहेत.

अनन्या पांडे नेहमीच आपल्या पार्टीचे फोटो शेअर करताना दिसते. अनन्या पांडेने शेअर केलेल्या या फोटोवर तिने एका बाजूला शिमर लावलेले दिसतं आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती आपल्या मैत्रींसोबत मजा करताना दिसत आहे.

शाहरुख खान (Shahrukh Khan)चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan)सध्या ड्रग्ज प्रकरणामुळे जास्तच चर्चत आहे. मित्र मैत्रींसोबत सोशल मीडियावर तो नेहमी फोटो शेअर करत असतो. त्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याच्या माने जवळ लव्ह बाईटसुदधा दिसतं आहेत.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda)सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये नव्या तिच्या मैत्रिणीसोबत डिस्को करताना दिसत आहे.

संजय कपूर (Sanjay Kapoor)ची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) इंस्टाग्रामवरती खुपच सक्रीय असते. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिच्यासोबत खुशी कपूरसुध्दा नजर येत आहे. या फोटोला पाहून ते समुद्रावर पार्टीकरताना दिसत आहे.

अभिनेत्री पूजा बेदी (Pooja Bedi)यांची मुलगी अलाया एफ (Alaya F)सोशल मीडीयावर खुपच सक्रीय असते. अलाया हिने बॉलिवूडमध्ये पर्दापणसुद्धा केले आहे. हा फोटो तिच्या वाढदिवसाचा आहे. या फोटोमध्ये ती तीच्या मित्र मैत्रिणीसोबत डांन्स करताना पाहायला मिळत आहे.

अनुराग कश्यप (Anurag Kashyap) ची मुलगी आलिया कश्यप (Aaliyah Kashyap)चित्रपटसृष्टी पासून जरी लांब असली तरी ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. तीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती समुद्रावर पार्टी करताना दिसत आहे.