Photo : मुंबईतील वांद्र्यात लाठीचार्ज, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांची धरपकड

Mumbai News : मुंबईतील वांद्रे पूर्व येथे रेल्वेकडून गरीब नगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे, यावेळी स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक केली, त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

बापू गायकवाड | Updated on: May 20, 2026 | 6:02 PM
1 / 5
मुंबईतील वांद्रे पूर्व येथील गरीब नगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिम सुरू आहे. रेल्वे कडून राबविल्या जाणऱ्या या मोहिमेचा आज दुसरा दिवस आहे. आज या ठिकाणी मोठा गोंधळ पहायला मिळाला.

मुंबईतील वांद्रे पूर्व येथील गरीब नगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिम सुरू आहे. रेल्वे कडून राबविल्या जाणऱ्या या मोहिमेचा आज दुसरा दिवस आहे. आज या ठिकाणी मोठा गोंधळ पहायला मिळाला.

2 / 5

गरीब नगरमध्ये रेल्वेच्या जमिनीवरील बेकायदेशीर झोपड्यांवर बुलडोझर कारवाई केली जात आहे. मात्र या कारवाईला विरोध होत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वेने ही धडक मोहीम हाती घेतली आहे.

3 / 5

आज तोडक कारवाईवेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, जमावाने पोलिसावर बाटल्या आणि दगड फेकले, यामुळे परिस्थिती चिघळली. परिणामी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

4 / 5

लाठीचार्ज केल्यामुळे जमाव अधिक आक्रमक झाला, मात्र पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

5 / 5

गरीब नगर परिसरात झालेल्या या राज्यात काही पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us