PHOTO | सुपर ओव्हरचा थरार, बुमराहचा भेदक मारा, पोलार्ड म्हणतो….

| Updated on: Oct 19, 2020 | 7:31 PM

जसप्रीत बुमराहने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आतापर्यंत 15 विकेट्स घेतल्या आहेत.

1 / 4
जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा स्टार आणि डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज आहे.लसिथ मलिंगाच्या अनुपस्थितीत मुंबईच्या गोलंदाजीची जबाबदारी बुमराह पार पाडत आहे. मुंबईचा अष्टपैलू खेळाडू किरण पोलार्डने बुमराहचे कौतुक केलं आहे.

2 / 4
"बुमराह जागतिक ख्यातीचा गोलंदाज आहे. तो गेल्या काही काळापासून क्रिकेटच्या तीनही फॉरमेटमधील नंबर 1 बोलर आहे", अशा शब्दात पोलार्डने बुमराहचं कौतुक केलं आहे.

3 / 4
"आम्हाला बुमराहवर पूर्णपणे विश्वास आहे. लसिथ मलिंगा टीममध्ये असताना बुमराहने मलिंगाकडून गोलंदाजीचे धडे घेतले. आता मलिंगाच्या अनुपस्थितीत बुमराह मुख्य गोलंदाजाची भूमिका सार्थपणे पार पाडतोय", असंही पोलार्डने म्हटलं.

4 / 4
मलिंगाने कौटुंबिक कारणांमुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमातून माघार घेतली आहे. तेव्हापासून बुमराहवर गोलंदाजीची जबाबदारी आणखी वाढली आहे. बुमराहने यंदाच्या मोसमात आतापर्यंत 15 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमात 9 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे.