लोकसभेत गोंधळ घालणारा लातूरचा तरूण कोणत्या खासदाराच्या पासवर सभागृहात गेला?

| Updated on: Dec 13, 2023 | 3:53 PM

Security Breach in Loksabha Parliament Winter Session 2023 : देशाचं सर्वोच्च सभागृह लोकसभेत आज गोंधळ पाहायला मिळाला. दोन व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या घेतल्या. या दोघांच्या शूजमधून पिवळ्या रंगाचा धूर बाहेर पडला. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ पाहायला मिळाला. पाहा फोटो...

1 / 5
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. सभागृहाचं कामकाज सुरु असताना दोन अज्ञात व्यक्तींनी लोकसभेत उडी घेतली अन् देशात खळबळ उडाली.

2 / 5
प्रेक्षक गॅलरीतून अज्ञातांनी थेट खासदार बसलेल्या बाकांवर उडी मारली. यावेळी त्यांच्याकडे स्मोक कँडल होती. या तरूणाने आपले शूज काढले अन् अख्ख्या सभागृहात एकच गोंधळ उडाला.

3 / 5
अज्ञातांनी स्मोक कँडल फोडल्यानंतर सभागृहात सगळीकडे धूरच धूर पाहायला मिळाला. त्यामुळे मंत्री आणि खासदारांचा गोंधळ उडाला. त्यानंतर सगळे खासदार सभागृहाबाहेर पडले.

4 / 5
संसदेत गोंधळ घालणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील एका तरूणााचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या लातूरमधील अमोल शिंदे या तरूणाला संसदेत गोंधळ घातल्या प्रकरणी अटक केली आहे. हरयाणातील नीलम कौर सिंह या महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

5 / 5
संसदेत गोंधळ घालणारे तरूण कर्नाटकातील मैसूरचे खासदार प्रताप सिम्हा यांच्या पासवर संसदेत आल्याची माहिती आहे. तर मध्यप्रदेशमधील खासदारांच्या मदतीने हे पास बनवण्यात आले होते. या प्रकरणाची आता आयबी टीमकडून कसून चौकशी होत आहे.