भगरे गुरुजींची कन्या मराठी मालिकेत व्हिलन, पाहा ग्लॅमरस फोटो

भगरे गुरुजींची कन्या अनघा अतुल स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' मालिकेत अभिनय करते. (Atul Shastri Bhagare Daughter Anagha)

| Updated on: Apr 19, 2021 | 4:14 PM
1 / 6
झी मराठी वाहिनीवर 'वेध भविष्याचा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्योतिषाचार्य भगरे गुरुजी दैनंदिन राशीभविष्य सांगतात. या कार्यक्रमातून भगरे गुरुजी आरोग्यमंत्र, पौराणिक कथा, वास्तूशास्त्र याविषयीही माहिती देतात.

2 / 6
वे. शा. स. पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची कन्याही मनोरंजन विश्वात झळकते. भगरे गुरुजींची कन्या अनघा अतुल स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' मालिकेत अभिनय करते.

3 / 6
अनघा 'रंग माझा वेगळा' मालिकेत श्वेताची खलनायकी व्यक्तिरेखा साकारते. दीपा आणि कार्तिक यांच्या आयुष्यात वाद निर्माण करणाऱ्या श्वेतावर प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होतो.

4 / 6
याआधी अनघाने महेश कोठारे यांच्या 'कोठारे व्हिजन'मध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम केलं आहे. तसंच ऋतुजा बागवेची मुख्य भूमिका असलेल्या 'अनन्या' नाटकातही तिने अनन्याची मैत्रीण प्रियांकाची भूमिका साकारली होती.

5 / 6
नुकतंच अनघाने सोशल मीडियावर आपलं बोल्ड फोटोशूट शेअर केलं होतं

6 / 6
अतुल भगरे गुरुजी सध्या झी मराठीवर 'घेतला वसा टाकू नको' या पौराणिक मालिकेचेही सूत्रसंचालन करतात. सणवाराच्या निमित्ताने भगरे गुरुजी त्यांच्याशी निगडित कथा आणि पौराणिक महत्त्व सांगतात.