PHOTO: उरलेले अन्न आणि सुका कचऱ्याचा वापर, कर्जतमध्ये 300 झाडं असलेलं अनोखं ‘टेरेस गार्डन’
अहमदनगरला कर्जत शहरातील गृहिणी सुवर्ण पोटरे यांनी आपल्या घराच्या छतावर सुंदर बाग फुलवली आहे.
अहमदनगरला कर्जत शहरातील गृहिणी सुवर्ण पोटरे यांनी आपल्या घराच्या छतावर सुंदर बाग फुलवली आहे.
सध्या ही बाग बघण्यासाठी अनेक जण हजेरी लावताहेत. तसेच बागेला भेट देऊन या उपक्रमाचं कौतुक करत आहेत.
या बागेत सुवर्णा पोटरे यांनी वेगवेगळ्या प्रकारची तब्बल 300 झाडं लावली आहेत.
विशेष म्हणजे घरातील उरलेले अन्नपदार्थ तसेच ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करत त्याचे कंपोस्ट खत तयार केले जाते.
हेच खत या झाडांना वापरले जाते. ही बाग 700 चौरस फूट जागेत फुलवण्यात आलीय.
या बागेत पक्षीही मनसोक्त मुक्काम करताना पाहायला मिळतात.
सध्या या बागेत वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, फळे, फुलं आणि औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आलीये.
या बागेत आंबा, चिकू, सिताफळ, संत्रा, मोसंबी, लिंबू, पेरू, अंजीर अशी अनेक फळझाडंही लावण्यात आली आहेत.
भाजीपाल्यामध्ये कारले, अळूची पाने, मेथी, शेपू, पालक, वांगी, टोमॅटो, काकडी, हादग्याची फुलं, वाल, तांदूळसा लावण्यात आलाय.
त्याचबरोबर कृष्ण तुळस, रान तुळस, गवती चहा, पुदिना, पानफुटींचाही समावेश आहे.
फुलांमध्ये गुलाब, रान चाफा, सोनचाफा, मोगरा, रेनलिली, जास्वंद, शेवंती, चिनी रातराणी, तागडा, निशिगंध, गुलाब, गोकर्ण फुलांची झाडे या ठिकाणी लावण्यात आली आहेत.