PHOTOS : केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात देशभरात शेतकऱ्यांचा ‘रेल रोको’
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 2 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून आंदोलन सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून आज देशभरात रेल रोको करण्यात आला. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं.
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी चार तास रेल्वे रोखून धरत रेल्वे ट्रॅक बंद पाडला होता.
हरियाणाच्या सोनीपतमध्येही विविध शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी 4 तासांच्या रेल रोको आंदोलनावेळी रेल्वे ट्रॅक ब्लॉक केला होता.
बिहारची राजधानी पाटना इथं जन अधिकार पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चार तास रेल्वे अडवून धरत जोरदार आंदोलन केलं.
हरियाणाच्या गुरुग्रामध्येही विविध शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे अडवून धरली. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
पंजाबच्या अमृतसरमध्ये विविध शेतकरी संघटनांनी रेल्वे ट्रॅकवर झोपत कृषी कायद्यांना विरोध केला आणि रेल्वे अडवून धरली.
उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्येही शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रेल रोको दरम्यान रेल्वे ट्रॅकवर बसून आंदोलन केलं.
झारखंडची राजधानी रांचीमध्ये CPI, CPM च्या कार्यकर्त्यांनी 4 तास रेल रोको आंदोलन करत केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध केला.
संबंधित बातम्या :
Farmers protest | शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार?, 40 लाख ट्रॅक्टर दिल्लीत आणण्याचा राकेश टिकैत यांचा इशारा
कोरोना काळात पहिल्यांदाच अनारक्षित मेल/एक्सप्रेस विशेष गाड्या धावणार; काय असेल खास?
Rail Roko of farmers’ organizations across the country against the agricultural law