Purvanchal Expressway: पूर्वांचल एक्सप्रेस- वे सुपरफास्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या हायवे एयर लँडिंग स्ट्रिपचं उद्घाटन

| Updated on: Nov 16, 2021 | 3:29 PM

पूर्वांचल एक्सप्रेस- वेवर आज देशातील पहिल्या हायवे एयर लँडिंग स्ट्रिपचं उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वायुसेनेच्या C-130 हरक्यूलिस विमानाने प्रवास करुन देशातल्या पहिल्या हायवे एयर लँडिंग स्ट्रिपचं केलं उद्घाटन केले.

1 / 6
पूर्वांचल एक्सप्रेस- वेवर आज देशातील पहिल्या हायवे एयर लँडिंग स्ट्रिपचं उद्घाटन  करण्यात आले आहे. यावेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वायुसेनेच्या C-130 हरक्यूलिस विमानाने प्रवास करुन पूर्वांचल एक्सप्रेस- वे वरती पोहचले. त्यानंतर देशातल्या पहिल्या हायवे एयर लँडिंग स्ट्रिपचं केलं उद्घाटन केले.

2 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वायुसेनेच्या C-130 हरक्यूलिस विमानाने सुलतानपूरमधील करवल खीरी, पूर्वांचल एक्सप्रेसवेवर उतरले. पूर्वांचल एक्सप्रेस हायवे 341 किमी लांबीचा आहे. लखनऊमधील चांद सराय येथून सुरू होऊन तो गाझीपूरला संपतो. या हायवेच्या निर्मितीसाठी  २२ हजार ४९७ कोटी रुपये खर्च आला. हा एक्स्प्रेस वे लखनऊ, बाराबंकी, अमेठी, अयोध्या, सुलतानपुर, आंबेडकरनगर, आझमगढ, मऊ आणि गाझीपूर या ९ जिल्ह्यातून जातो.

3 / 6
या कार्यक्रमामध्ये भारतीय हवाई दलाचा एयर शो सादर केला. C-130J विमानाद्वारे, भारतीय हवाई दलाचे गरूड कमांडो आणि विशेष दलातील कमांडो ग्रुप इन्सर्शन ड्रिल  सादर केले. त्याचबरोबर सुखोई, जग्वार आणि मिराज या फायटर विमानांनीसुद्धा आपली जादू दाखवली.

4 / 6
या महामार्गाप्रमाणे देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर विविध राज्यांमध्ये आणखी 19 आपत्कालीन लँडिंग स्ट्रिप तयार केल्या जाणार आहेत. ज्यामध्ये राजस्थानमध्ये 3, पश्चिम बंगालमध्ये 3, तामिळनाडूमध्ये 1, आंध्र प्रदेशमध्ये 2, गुजरातमध्ये 2, हरियाणामध्ये 1, पंजाबमध्ये 1, जम्मू-काश्मीरमध्ये 1 आणि आसाममध्ये 5 आपत्कालीन लँडिंगचा समावेश आहे.

5 / 6
 पूर्वांचल हायवे एयर लँडिंग स्ट्रिप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 1 ट्रिलियन USD इकोनॉमी चे स्वप्न देखील पूर्ण करले अशा अनुसंगाचे ट्विट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी केले आहे.

6 / 6
या कार्यक्रमाच्यावेळी जमा झालेल्या जमावाने कोरानाचे नियम पायदळी तुडवलेले पाहायला मिळत आहेत.