जगातील सर्वात खतरनाक मासा, एकाच वेळी घेऊ शकतो 30 लोकांचा जीव
Dangerous Fish : जगात माशांच्या हजारो प्रजाती आहेत. यातील काही प्रजाती खूप खतरनाक आहेत. माशाची एक प्रजाती अशी आहे जी एकाच वेळी 30 लोकांचा जीव घेऊ शकते. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

अत्यंत विषारी मासा: पफर फिश हा सर्वत खतरनाक मासा आहे. हा मासा दिसायला गोंडस असला तरी तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात विषारी कणा असलेला प्राणी मानला जातो.

30 जणांचा मृत्यू होऊ शकतो: या एका माशामध्ये इतके विष असते की, त्याद्वारे एकावेळी 30 प्रौढ माणसांचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे यापासून दूर राहणे कधीही चांगले.

घातक विष (Tetrodotoxin): या माशाच्या शरीरात 'टेट्रोडोटॉक्सिन' नावाचे विष असते, जे सायनाइडपेक्षा 1200 पटीने अधिक घातक असते. त्यामुळे तो एकाचवेळी अनेकांचा जीव घेऊ शकतो.

उपचार उपलब्ध नाही: सर्वात भीतीदायक बाब म्हणजे पफर फिशच्या विषावर अद्याप कोणतेही नेमके औषध किंवा उतारा (Antidote) उपलब्ध नाही. त्यामुळे तो जीवघेणा मासा ठरतो.

विशिष्ट शारीरिक रचना: जेव्हा या माशाला धोका जाणवतो, तेव्हा तो स्वतःच्या शरीरात पाणी किंवा हवा भरून घेतो आणि चेंडूसारखा फुगतो, ज्यामुळे शत्रू त्याच्यावर हल्ला करू शकत नाही.