Raj Hanchanle : शायनर चमकला ! राज हंनचाळेंच्या क्लासी लूकवर नेटकरी फिदा
‘सनई चौघडे’ मालिकेतील जय खानविलकरच्या भूमिकेतून राज हंनचाळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.आता त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधील क्लासी आणि स्टायलिश लूकचीही जोरदार चर्चा होत आहे.

मराठी मालिकांमधून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडणार अभिनेता म्हणजे राज हंनचाळे....तुझ्यात जीव रंगला मधील सनी दादा च्या भूमिकेनंतर आता तो 'सनई चौघडे'मध्ये जय खानविलकरच्या भूमिकेत दिसतोय. मालिकेतील तर जय आणि शरू प्रेक्षकांच्या पसंतीचे झालेच आहेत.त्यातच आता राजचे सोशल मीडियावरचे फोटोही चर्चेत आले आहेत..
राज हंनचाळेने सोशल मीडिायावर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याचा स्टायलिश आणि स्मार्ट लूक पाहायला मिळतोय. त्याच्या या फोटोंमुळे कमेंट सेक्शनमध्ये प्रेमाचा पाऊस पडला आहे.
सनई चौघडे मध्ये राज जय खानविलकर ही व्यक्तिरेखा साकारत आहे. सुरूवातीला प्रेमापासून दूर राहणारा जय आणि आता शर्वरीच्या प्रेमात पडलेला जय मालिकेच्या कथानकाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
राज हंनचाळे आणि चिन्मयी साळवी यांची जय - शर्वरीची जोडी सध्या मालिकेतील चर्चेचा विषय आहे. दोघांमधील आधीची तू - तू, मै-मै ची भांडणा आता हळूहळू प्रेमाच्या ओढीमध्ये, जवळिकीमध्ये बदलताना दिसत आहे.
मालिकेतील जयचा स्टायलिश अंदाज आणि राजचा ऑफस्क्रिन लूक पाहून नेटकरी भलतेच खूश झाले आहेत, नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलंय की राज नाम हि काफी हे, पर ये लूक तो सीधा दिल पे राज कर गया.
आजचा जय खानविलकर प्रेक्षकांना आवडत असला तरी राज हंनचाळेला खरी ओळख मिळवून दिली ती तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील सन्नी दा म्हणजेच सूरज गायकवाड या भूमिकेने.
एका मालिकेत सन्नी दा म्हणून ओळख नि्र्माण केल्यानंतर आता राज एका वेगळ्या भूमिकेत दिसतोय. जय खानविलकरच्या व्यक्तिरेखेतून त्याचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.आता हे फोटो पोस्ट केल्यानंतर राजच्या या पोस्टवर प्रेमाच्या कमेंट्सचा आणि लाईक्सचा पाऊस पाहायला मिळतोय. शायनर आता चमकतोय