Budh Gochar| सोनियाचा दिवस ! आज होणार बुधाचे संक्रमण, या 5 राशींच्या लोकांच्या मनातील प्रत्येक ईच्छा पूर्ण होणार !

ज्योतिषशास्त्रात बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, व्यवसाय यांचा कारक ग्रह मानला जाणारा बुध ग्रह आज म्हणजेच 6 मार्च 2022 रोजी राशी बदलत आहे. बुध कुंभ राशीत प्रवेश करत आहे, ज्यामुळे 5 राशीच्या लोकांना मोठा फायदा होईल. या लोकांना बुध ग्रहाच्या कृपेने भरपूर पैसा मिळेल, तसेच करिअरमध्ये यश मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

Mrunal Patil | Updated on: Mar 06, 2022 | 9:20 AM
1 / 5
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदान देणारा ठरेल. नोकरीत पदोन्नती, वेतनवाढ किंवा कोणतेही मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन चांगले राहील.

मीन - मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदान देणारा ठरेल. नोकरीत पदोन्नती, वेतनवाढ किंवा कोणतेही मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन चांगले राहील.

2 / 5

धनु - धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरेल. पैशासाठी नवीन मार्ग मिळतील. उत्पन्न वाढेल. करिअरमध्ये प्रगती आणि सन्मान मिळेल. या काळात तुमची अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील.

3 / 5

वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप फायदा होईल. बेरोजगारांची आणि नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांची प्रतीक्षा संपुष्टात येईल. आत्मविश्वास वाढेल. धनलाभ होईल.

4 / 5

मिथुन - बुधाचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात भरपूर लाभ देईल. प्रतिष्ठा वाढेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. यावेळी केलेल्या कामात यश मिळेल. जर तुम्हा नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल. बढती-वाढ मिळण्याची शक्यता आहे.

5 / 5

मेष - मेष राशीच्या लोकांना धनलाभ होईल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यवसायात नफा वाढेल. समाजात मानसन्मान मिळेल प्रत्येक कामात भाग्य तुम्हाला साथ देईल. नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही दृष्टीने हा काळ अतिशय शुभ आहे. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us