Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 29 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी छान असेल. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता. ऑफिसच्या कामात तुम्हाला तुमच्या बॉसकडून दाद मिळेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.
3 / 10
आज कौटुंबिक संबंध दृढ होतील. थोडे कष्ट करून उद्दिष्टे सहज साध्य करता येतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.तुमचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.
4 / 10
आज तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे हेतू सहज समजतील. प्रत्येक काम वेळेवर पूर्ण झाल्यास तुम्हाला आनंद वाटेल. तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
आज तुम्ही उच्च पदावर असलेल्या लोकांच्या संपर्कात येऊ शकता. पैशाची कमतरता दूर झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल.आज घाईघाईने दिलेलं वचन पूर्ण करणे कठीण जाईल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग पांढरा राहील.
6 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील.सामाजिक संपर्काचा फायदा घेण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. काही कामात अडथळे येतील, पण अधिकाऱ्यांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. शुभ रंग 14 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. काही वैयक्तिक कामात भावाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला एखादी सुंदर भेट मिळू शकते. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील.
8 / 10
आज तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी लक्षणीय यश मिळेल. काही महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पांढरा राहील.
9 / 10
आज तुम्हाला काही कामातून मोठा फायदा होऊ शकतो. जुन्या मित्राला भेटल्यानंतर तुम्हाला आनंद वाटेल. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल.नशिबाची साथ मिळण्यात काही अडचण येऊ शकते. शुभ अंक 20 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. आज कोणावरही रागावणे टाळा. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधीही उपलब्ध होतील. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)